विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला ? मित्रपक्षाच्या वाट्याला कमी जागा मिळणार?

लोकसभा निवडणक २०२४ ला झालेल्या जागा वाटपाच्या तिढ्यामुळे महायुतीला निकालावेळी मोठा फटका बसला होत्या. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील महायुतीत फटका बसण्याची शक्यता आहे. 

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला ? मित्रपक्षाच्या वाट्याला कमी जागा मिळणार?

लोकसभेनंतर आता काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक येऊन ठेपल्याने आता सर्वपक्षीयांची जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपांवरुन चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतय. अशातच महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतं आहे. आधीच लोकसभेमध्ये महायुतीत जागावाटपावरुन चुरशीची लढत रंगली होती. पण आता विधानसभेसाठी देखील तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी रात्री झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यात जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

देशात महत्त्वाचा आणि पहिल्या क्रमाकांवर असलेला पक्ष म्हणजे भाजप ला मानतात.लोकसभेच्या निवडणुकीत र्वाधिक जागा या भाजपच्या वाट्याला मिळाल्या. त्यामुळे तेव्हा देखील मित्रपक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरु असल्याचं दिसून आलं त्यातच आता भाजपला १५५ जागा लढायला हव्यात असं मत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांनी मांडल्या तर शिंदेंच्या सेनेची ६०-६५ जागा लढवण्यावर आग्रही आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५०-५५ जागा सोडण्याचा विचार सुरु आहे अशी प्राथमिक माहिती आहे.  त्यामुळे यंदा ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला पुन्हा एकदा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील भाजप हा मित्रपक्षासाठी कमी जागा देणार असं दिसतं आहे.

लोकसभेत मिळालेल्या पराभवानंतर आता महायुतीत वादाची ठिणगी पडायला लागली आहे. त्याचबरोबर लोकसभेत मिळालेल्या अपयशावर देखील कोअर कमिटीत चर्चा झाली. २०१९ मध्ये  विधानसभेत भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या.त्यामुळे सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या पाहिजेत. पण अशा पद्धतीच्या जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला जाहीर करण्यात आला असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणक २०२४ ला झालेल्या जागा वाटपाच्या तिढ्यामुळे महायुतीला निकालावेळी मोठा फटका बसला होत्या. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील महायुतीत फटका बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version