नवी मुंबईत गुन्हे शाखाची मोठी कारवाई, 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबईमध्ये गुन्हे शाखाच्या पथकाने मोठी कारवाई करत 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

नवी मुंबईत गुन्हे शाखाची मोठी कारवाई, 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुन्हे शाखाच्या पथकाने मोठी कारवाई करत 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. बाजारात तब्बल 363 कोटी रुपये किंमत असलेले हे 73 किलो ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. दुबईहून आलेल्या एका कंटेनर मधून हे अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

थेट दुबईहून आलेल्या एका कंटेनरमध्ये ही अमली पदार्थ पोलिसांना सापडले. 336 कोटी रुपये किंमत असलेले हे अमली पदार्थ जेएनपीटी येथे एका गोडाऊन मधून जप्त केले. डिसेंबर 2021 मध्ये हा कंटेनर दुबईहून आला होता. पण यावर गेल्या सहा महिन्यातच्या काळात कोणीही मालकी सांगितली नव्हती. पोलिसांना या संबंध प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी त्या गोडाऊन धाड टाकली. पंजाब पोलिसांच्या मदतीने नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई यशस्वी पार पाडली.

हेही वाचा : 

शिवसैनिकांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

Exit mobile version