IIT मुंबईतील गर्ल्स होस्टेलमध्ये गैरप्रकार; बाथरुममध्ये डोकावणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

IIT मुंबईतील गर्ल्स होस्टेलमध्ये गैरप्रकार; बाथरुममध्ये डोकावणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. मुंबईतील पवई आयआयटीमध्ये (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या) महिलांच्या शौचालयात डोकावताना एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. पवई पोलिसांनी या डोकावणाऱ्याला अटक केली आहे. विद्यार्थिनीचा आरोप आहे की, रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह १० (H १०) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. पिंटू गरिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही.

आयआयटी बॉम्बेच्या प्रवक्त्याने सांगितले की, वसतिगृह-१० मधील राहणाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हेगार पकडला गेला. त्यानंतर त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी सांगितले की, वसतिगृहाच्या नाईट कॅन्टीनचे कर्मचारी पाईप डक्टच्या मदतीने चढून बाथरूममध्ये डोकावत होता. संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आरोपीने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू. आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू म्हणाले की, वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई केली आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला आहे. तरुणींच्या तक्रारीवर पवई पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

हे ही वाचा:

के एल राहुलने स्लो – स्ट्राईक रेटवर मौन सोडले म्हणाला,’कोणीही परिपूर्ण नसतं’

Nana Patole : राज्यातील १७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा असलयाचे नाना पटोल्यांचे व्यक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version