spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नव्या जीआरवर मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका केली स्पष्ट, म्हणाले…

जालन्यातील (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक उपोषणासाठी बसले होते.

जालन्यातील (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक उपोषणासाठी बसले होते. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलीस आणि आंदोलक मोठ्या संख्येने जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. मराठा आंदोलकानावर लाठीमार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर निषेद व्यक्त करण्यात आला होता. काही ठिकाणी मोठ्या संख्येने बस जाळण्यात आल्या तर काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अनेक नेत्यानी त्याची भेट घेतली. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालनामध्ये गेले होते. मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. दरम्यान मनोज जरंगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ शासनाच्या जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती न झाल्यामुळे माझे उपोषण चालू राहील ‘ अशी भूमिका मनोज जराने यांनी मांडली आहे.

अजूनही लाठीमार केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही फक्त पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळया झाडणारे अधिकार शिष्ट मंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरंगे यांनी केली आहे.

मराठा आरक्षण्याच्या मुद्यावर सरकारने जीआर पाठवला आहे त्यावर मनोज जरांगे यांनी त्याची भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांच शिष्ट मंडळ देखील बैठकीत उपस्थित होते. यावेळी त्यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. जरांगे यांच्या शिष्ट मंडळाचे बोलने ऐकून घेत काही बदल करण्यास सहमती दर्शवली असल्याची देखील माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बंद पाकिटात जीआर पाठवला होता. हे बंद पाकीट घेऊन शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर सराटी गावात गेले. त्यानंतर हे जीआर मॅनेज जरांगे यांच्या हातात देण्यात आले. त्यानंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Latest Posts

Don't Miss