Friday, September 27, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणच्या मुद्यावरून मनोज जरांगे यांनी केली छगन भुजबळ यांच्यावर टीका

मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे हे उपोषणासाठी बसले होते. त्यानंतर त्यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट देऊन उपोषण मागे घेतले.

मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे हे उपोषणासाठी बसले होते. त्यानंतर त्यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट देऊन उपोषण मागे घेतले. पण आता मनोज जरांगे आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार वाद झाले आहेत. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आमच्या आरक्षणात त्यांना वाटा नकोच, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. भुजबळांच्या या भूमिकेवर जरांगे यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठ्यांना आरक्षण न देण्याचा ठेका तुम्ही चारपाच लोकांनी घेतला आहे काय?, असा संतप्त प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच सरकारनेही आम्हाला चॉकलेट दाखवू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगे राज्यातील काही भागांमध्ये दौरा करणार आहेत, त्याच्या दौऱ्याची सुरुवात कालपासून झाली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून ते तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. आरक्षणाचे महत्व सांगणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचे स्वागत करून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. भुजबळ आमचे वैयक्तिक दुश्मन नाहीत. ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. तुमचं जीवमान उंचावलं. तेव्हा मराठ्यांनी तुम्हाला कधी विरोध केला नाही. तुमच्या प्रगतीच्या आणि आरक्षणाच्या आड आम्ही आलो नाही. मग आम्हाला मोठं करताना तुमची ही भावना अशी का? काय चुकीचं बोलतो आम्ही? असा सवाल करतानाच छगन भुजबळ यांनी त्यांच्या मतात आणि मनात बदल करावा. मराठा समाज त्यांच्या पाठी उभा राहील, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. द्या मराठ्यांना आरक्षण, आम्ही तुमच्या पाठी राहू. पण ते तसं म्हणणार नाही. ५० टक्क्याच्या आत येऊ देणार नाही ही भाषा भुजबळ वापरत आहेत. मोठ्या नेत्यांनी असा शब्द वापरू नये. कुठे जायचं मराठ्यांनी? काय मराठ्यांनी केलं तुमचं? द्वेषच झाला ना हा? भुजबळ हे खासगीत किंवा इतर ठिकाणी बोलत नाहीत. तर आंदोलनाला भेट देताना बोलत आहेत. त्यामुळे लोकांचा उद्रेक होतो. त्यांच्या भावना भडकल्या जातात.

तुम्ही दोन्ही समाजाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. धक्का लागू देणार नाही… म्हणजे? मराठ्यांनी तुम्हाला काहीच सहकार्य केलं नाही का आतापर्यंत? का ही भाषा वापरत आहात? काय कारण आहे? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना का द्यायचं नाही आरक्षण? तुम्ही चारपाच जणांनी मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्याचा ठेकाच घेतलाय का? असा सवाल त्यांनी केला. भुजबळ संवैधानिक पदावर बसले आहेत. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी विधाने करू नयेत. उलट मराठ्यांना आरक्षण द्या हेच तुम्ही सांगितलं पाहिजे. मन मोठं केलं पाहिजे, असं सांगतानाच मराठा समाजाने शांततेनेच आंदोलने करावीत असं आवाहन मी करतो, असंही ते म्हणाले.मराठ्यांना सरसकटच आरक्षण दिलं पाहिजे. अर्धवट आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. देवेंद्र फडवणीस ही म्हणतात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. मराठ्याच्या मुळावर का उठला? तुम्ही मराठ्यांसोबत असं वागू नका. तुमच्या मनात बदल करा. सरकारने समजून घेणे गरजेचं आहे. सरकारने आरक्षणाच्या मुद्द्याला पूर्ण विराम द्यावा. सरकारने आम्हाला चॉकटेल दाखवू नये. पूर्ण आरक्षण द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

हे ही वाचा: 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केले जनतेला आवाहन

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाहेर सापडले 2 कोटीचे अंमली पदार्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss