Thursday, July 4, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil आणि Chhagan Bhujbal यांच्यात कुणबी नोंदींवरून पुन्हा ‘तु तु मै मै!’

कुणबी नोंदींवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात पुन्हा एकदा 'तु तु मै मै' सुरु झाली आहे.

राज्यात मराठा आणि ओबीसी वाद (Maratha Resrvation) (OBC Reservation) पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता दिसत आहे. ओबीसींमधून मराठा आरक्षण द्यावे या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीला आता ओबीसी नेत्यांनी चांगलाच विरोध दर्शवला त्यांनी आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake), नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी याविरोधात आमरण उपोषण सुरु केले असून आज (शनिवार, २२ जून) उपोषणाचा दहावा दिवस आहे. अश्यातच, आता कुणबी नोंदींवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात पुन्हा एकदा ‘तु तु मै मै’ सुरु झाली आहे. छगन भुजबळ यांनी ‘ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यात बोगस प्रमाणपत्र घेणारा आणि देणारा दोघेही गुन्हेगार आहेत,’ असे वक्तव्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देत मनोज जरांगे पाटील यांनीही, ‘आमच्या एकही कुणबी नोंदी खोट्या नाहीत. छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यांमध्ये भांडण लावून द्यायचे आहे,’ असा पलटवार त्यांनी केला आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “गेल्या दहा दिवसांपासून वडीद्रोगीत लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि पुणे येथे मंगेश ससाणे उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी, शिष्टमंडळ,नेत्यांची आणि मंत्र्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात काही निर्णय झाले आहेत. या निर्णया संदर्भात आज आम्ही आंदोलकांची भेट घेणार आणि चर्चा करणार आहोत. ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यात बोगस प्रमाणपत्र घेणारा आणि देणारा दोघेही गुन्हेगार आहेत.”

यावर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले, “आमच्या एकही कुणबी नोंदी खोट्या नाहीत. स्वतःला जातीवादी म्हणायचे नाही हे सुरू आहे याला काय म्हणतात? छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यांमध्ये भांडण लावून द्यायचे आहे. गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब मराठी मध्ये भांडण लावून तो घरात बसणार… उपोषणकर्ते त्यांच्या लक्षात येईना आपण कोणासाठी काम करतोय… मी आतापर्यंत धनगर बांधवांच्या बद्दल काही बोललो नाही याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही पण करावं… छगन भुजबळ हा दोघांमध्ये वाद लावण्याचे काम करत आहे. छगन भुजबळ म्हणतो मी साडेचारशे जातीचे काम करतो बाकीचे सोडल्या का? मराठ्यांनी काय केलं? धनगर बांधवात आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहे हा काय द्वेष आहे? मराठ्यांचा सुद्धा नेता झाला असता. सगळ्याची अंमलबजावणी सरकारला करावीच लागणार आणि सरकारला मराठा समाजाची नाराजगी परवडणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “सरकार असं मराठ्यांवर अन्याय करू शकत नाही. ओबीसींबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्याच्या बद्दल महाराष्ट्रातले सरकार नाही घेऊ शकत. कारण आमचं हक्काचा आरक्षण आहे. त्यांना जसं वाटतं आरक्षण असून सुद्धा जास्तीचे मिळावं येवल्याच्या छगन भुजबळला तसे आम्ही ओरडत नाही. आमचं हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही. सरकार जर पहिल्यासारखेच करायला लागलं की आम्हाला ओबीसीची गरज आहे, आमची नाही तर मग आमचा नाईलाज आहे. आमच्यावर कारवाई करणार जशा केसेस खोट्या केल्या तसं आमच्या नोंदी सापडूनही खोटं ठरवणार म्हणून येवल्याच्या नेत्यातून बोलणार आणि मराठ्यांवर अन्याय करणार… कारण की सरकार तुमचं आहे. १९९४ ला ज्या नेत्यांनी आरक्षण दिले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. तेही १६% रद्द करा ते का जमत नाही? ते खरं आहे का? द्वेष जात आणि जातिवाद कोण वाढवत? हे सर्व तुम्हीच खोड्या करता. १३ टक्के आरक्षण दिले आता दहा टक्के दिले आणि त्या अगोदरच कोर्टात याचिका दाखल केली. ५७ लाख नोंदी सापडल्या प्रमाणपत्र देण्याऐवजी ते रद्द करणार आणि का असे केलं म्हणून आम्ही जातीयवादी? तुम्ही कसे वागता?”

ते पुढे म्हणाले, “धनगर बांधव ओबीसी बांधवांच्या नेत्यांनी मराठा द्वेष ठेवू नका. सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेचे म्हणून राहा किमान जनतेचे म्हणून सल्ला वगैरे मी काही देत नाही. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलणं शिका. धनगर बांधवांवर कोणता अन्याय झालेला आहे म्हणून छगन भुजबळ म्हणता? मराठ्यांशिवाय पत्ता हालत नाही.. राज्यांमध्ये निवडणूक आल्यानंतर जात काढली म्हणून बुरखा उघडा पडला.”

हे ही वाचा

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss