Sunday, July 7, 2024

Latest Posts

Maha Govt ला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपायचे आहे, आंदोलन होऊ न देण्याचं षडयंत्र: Manoj Jarange Patil

मराठा आरक्षण (Maratha Reservation) कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज (शनिवार, ८ जून) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी, त्यांनी हे राज्य सरकारचे (Maharashtra Government) षडयंत्र असल्याचे गंभीर आरोप केले.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पोलीस प्रशासनाने अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) मध्ये आमरण उपोषणाला परवानगी नाकारली असून अंतरवाली सराटी मधील काही ग्रामस्थांनी जरंगे पाटील यांच्या उपोषणासाठी परवानगी देऊ नाई असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर मराठा आरक्षण (Maratha Reservation) कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज (शनिवार, ८ जून) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी, त्यांनी हे राज्य सरकारचे (Maharashtra Government) षडयंत्र असल्याचे गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपायचे आहे. हे राज्य सरकारच षडयंत्र आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या १० महिन्यात त्यांनी निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवेदन देऊ का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “मी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) विषय सोडून दिला आहे. निवडणुकीत हार – जीत होत असते. अंतरवालीच्या ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन जाणीवपूर्वक आहे. उद्या तुमच्या यात्रा निघतील. तेव्हा आम्हीही निवेदन देऊ. यामुळे रस्त्यावर रहदारीला त्रास होतो. विध्यार्थ्यांना शाळेत जायचे जाते. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असे आम्हीही निवेदनात सांगू. मग पोलीस त्या यात्रा रद्द करणार का?”

राज्य सरकारवर टीका करत ते पुढे म्हणाले, “मला प्रशासनाने नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे. अंतरवाली सराटीत उपोषणाच्या स्थळी मराठा समाजबांधवांनी येऊ नये. या लढ्यासाठी मी खंबीर आहे. कायदा – सुव्यवस्था बिघडू न देण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, गृहमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांची आहे. याठिकाणी काही झालंच तर याला जबाबदार निवेदन देणारेच असतील,” असे ते यावेळी म्हणाले.

अंतरवाली सराटी मधील ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध का?

अंतरवाली सराटी मधील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारण्याचे निवेदन दिले होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटीमधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनपत्रात अंतरवालीतील उपसरपंच, पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी या आंदोलनाला विरोध करत ‘हे आंदोलन भरकटत चाललेले असल्याचा आरोप केला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीदरम्यान गावातील जातीय सलोखा बिघडला होता असेदेखील ग्रामस्थांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा:

Exclusive: शिवसेनेनं गाठलं भगव्या नव्हे हिरव्या विजयाचं लक्ष्य, Muslim मतदार कोणाचे?

PM Narendra Modi यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट; सत्तास्थापनेचं दिलं आमंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss