दसऱ्याला मराठा समाज नारायणगडाकडे कूच करणार, Manoj Jarange Patil यांच्या दसरा मेळव्यावर अखेर शिक्कामोर्तब

दसऱ्याला मराठा समाज नारायणगडाकडे कूच करणार, Manoj Jarange Patil यांच्या दसरा मेळव्यावर अखेर शिक्कामोर्तब

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात मोठा वादंग निर्माण झाला असतानाच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मोठे पाऊल उचलणार असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीवरून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते, मात्र राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला आहे. आता जरांगे पाटील दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाज बांधवांसाठी दसरा मेळाव्याचे (Manoj Jarange Patil Dasara Melava)  आयोजन करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. आज (सोमवार, ३० सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत त्यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले. १२ ऑकटोबर या दिवशी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. बीड जिल्ह्यातील नारायण गडावर जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. राज्यात याआधीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा नागपूर येथे होतो. शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क येथे पार पडतो. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडमधील भगवानगडावर पार पडतो. तसेच शिवसेनेच्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावाही आता घेतला जातो. यात आता मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याचीही भर पडली असून बीडमधील नारायणगडावर जरांगेचा दसरा मेळावा पार पडणार आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “दसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता सर्व मराठा समाज बांधव नारायण गडाकडे कूच करणार आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना माझी विनंती आहे की गडावर दर्शनासाठी आल्यानंतर २ वाजेपर्यंत कोणीही गड उतरायचा नाही. गोर गरिबांसाठी हीच एकत्र येण्यासाठी योग्य वेळ आहे. सगळा मराठा समाज दसऱ्या दिवशी नारायण गडावर एकवटणार आहे. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी त्याचे धन्यवाद. नारायण गडावर होणारा दसरा मेळावा सामाजिक आहे, तिथे ना जातीचा विषय होणार, ना राजकारणार विषय होणार. विजया दशमीचा अर्थच आहे अन्यायाच्या विरोधात लढणे. मी स्वत: त्या दिवशी गडावर येणार आहे. दसरा मेळाव्यात जातीचा किंवा राजकारणाचा विषय नाही. जनता समाज सुखसमृद्धीकडे जायला हवी हाच आमचा प्रयत्न आहे. आम्ही स्पर्धा करणार नाही. आमच्यावर स्पर्धा करण्याचे संस्कार नाही आहेत. एकमेकांचे दुःख एकत्र येऊन व्यक्त करायचे आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version