Saturday, July 6, 2024

Latest Posts

Prakash Ambedkar यांच्या Laxman Hake भेटीवर Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद पार पडली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत आपापली मते मांडली. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया देत, “वेगळा कोणता प्रवर्ग ओबीसी मधून? वेगळा प्रवर्ग कसा? मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्ये आहे. ५० टक्के वर द्या, खाली द्या म्हणायची गरज नाही,” असे वक्तव्य केले.

प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी, “एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अश्या शाश्वत झालेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिकदृष्ट्या सलोखा बिघडला जातो. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे ताट वेगळे असले पाहिजे.” असे वक्तव्य केले.

यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ओबीसी मधून वेगळा कोणता प्रवर्ग? वेगळा प्रवर्ग कसा? मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्ये आहे. ५० टक्के वर द्या, खाली द्या म्हणायची गरज नाही. देश स्वतंत्र होण्यापूर्वी आरक्षण आहे. हे कायदेशीर आहे. तरीही आम्हांला आरक्षण नाही. आम्ही वेगळं काय मागत आहे. हैदराबाद गॅझेट ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. त्यांनी कितीही सांगितलं धक्का लागतो, नाही लागत तरी घेणार आहे. मराठा ओबीसी भिडवत ठेवतील तर पडून जातील. लोकसभेत जे झालं तस होईल. आरक्षण दिलं नाही तर २० वर्ष वर येऊ देणार नाही. सगेसोयरेची व्याख्या आम्ही दिली त्यानुसार आम्हांला आरक्षण द्या. शंभूराज देसाई, उदय सामंत यांना देखील सांगितले आहे. आंबेडकर यांच्याबद्दल बोलणार नाही. ज्यांचा सन्मान करतो, त्यांचा एक शब्द चुकला तर बोलू शकत नाही.”

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही सतराशे उमेदवार उभे करा, आम्हाला काय करायचं? आमचे विरोधक हाके नाही. आमचे विरोधक भुजबळ आहे. तुझीच बोलायची कुवत नाही. विरोधक मानत नाही. मी एकही धनगर नेत्याला बोललो नाही. त्यांना विरोधक मानलं नाही. मानणार सुद्धा नाही. आम्ही धनगर, वंजारी बांधवांचे आरक्षण मागत नाही.”

हे ही वाचा

OBC आणि Maratha Reservation यांचं ताट वेगळं असावं, Prakash Ambedkar यांनी घेतली Lakshman Hake यांची भेट

Ravindra Waikar यांना खासदारकीची शपथ देऊ नका…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss