Thursday, July 4, 2024

Latest Posts

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jaarange Patil) यांनी आता मराठा समाजासह मुस्लिम समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे (Muslim Reservation) अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

राज्यात आरक्षणप्रश्नी मराठा आणि ओबीसी समाजात होत असलेला वाद (Maratha Reservation) (OBC Reservation) आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jaarange Patil) यांनी आता मराठा समाजासह मुस्लिम समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे (Muslim Reservation) अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी आज (रविवार, २३ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनादेखील इशारा देत, “उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका नाही तर विधानसभेत गुलाल तुमच्यावर गुलाल रुसेल,” असे वक्तव्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले, “राज्य सरकारची काय भूमिका आहे. यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे आहे. किती खोटं बोलला यापेक्षा कायदा महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कडक निर्णय घ्यावा. गावात तालुक्यात सरकारी नोंदी आहे. त्यामुळे १३ तारखेच्या आत आरक्षण देणं बंधनकारक आहे. आपण खूपच स्पष्ट देण गरजेचे आहे. कुणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी रद्द करू शकत नाही. मी गोधा पट्ट्यात काम करत होतो बाहेर काम करतांना समाजाला सरकारला सांगितले. ८३ क्रमांकाचा ओबीसी मराठा एक आहे. २००४ ला मराठा कुणबी एक कायदा पारित करण्यात आला. आता याला जोडून सरकारच म्हणणं कुणबी ८३ क्रमांकला आहे. कुणबी मराठा वेगळा आहे म्हणत असाल तर प्रमुख जाती घातल्या नंतर १९९४ तेव्हा ३५० जाती झाल्या. मग या जाती झाली कशी? महाजन म्हणाले मराठा कुणबी वेगळं आहे. माळी असताना माळी समाजातील पोट जाती कश्या घेतल्या? जर त्यांची पोट जात होऊ शकते तर मराठा समाजाची कुणबी पोट जात होऊ शकत नाही का? १९९४ दिलेलं आरक्षण तातडीने रद्द करा,हे आरक्षण दिलं कसं ते १३ तारखेच्या अगोदर सांगा.व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिल असल तर आम्ही आमचा व्यवसाय दाखवतो. माळी समाज शेती करतो म्हणून दिलं असेल तर आम्हीला पण द्या.”

मुस्लिम आरक्षणावर मोठे भाष्य करत ते पुढे म्हणाले, “मुस्लिम समाजाच्या सरकारी नोंदी निघाल्या आहे. यामुळे मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या. कसं देत नाही ते बघतो. आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही १६ टक्के आरक्षण दिले कसं? आम्ही भाऊ मानलं मात्र तुम्ही आमच्या ताटात औषध कालवल आहे. लोहार, कुंभार समाजाच्या देखील सरकारी नोंदी आधारे आरक्षण द्या. बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करा, वरचे १६ टक्के उडवून टाका. सगेसोयरे आमच्या व्याख्या नुसार देत असाल तर द्या नाही तर देऊ नका. वाशी मध्ये उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका नाही तर विधानसभेत गुलाल तुमच्यावर गुलाल रुसेल. सरकार मनोज जरांगे लढणार आहे. तुम्ही आरक्षण घालवलं तर मी सोडणार नाही.शेपूट लांबलं म्हणायचं नाही. जे मराठ्याला आहे ते भुजबळला पाहजे. यामुळे भुजबळ ची शेपूट वाढत चालली आहे. धनंजय मुंडे म्हणाले मागेल त्याला द्यायच म्हणत असाल तर सरसकट च राहील काय? मी म्हणालो सरसकट द्या.”

ते पुढे म्हणाले, “१० टक्के कोर्टात टिकणार नाही. बिहार मध्ये उडल आहे. याबाबत कुणाला दोषी ठरणार. सरकारला धाऊन बोललं पाहजे. मात्र आता म्हणता गोळ दिसतो. मी कसा बदनाम होईल यासाठी प्रयत्न करत आहे. विरोधकांना लढायला समर्थ मात्र आपले लोक विरोध करत आहे. तुम्ही नाही दिलं तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल. आचारसंहिता नंतर देऊ म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही. ओबीसी असो अथवा मराठा प्रत्येकाला ठासून सांगायचं सरकारने शिकलं पाहजे. सरकार मराठ्याला देताय काय? फक्त कागद वाचता अन् जाहिराती करता का? खोटे प्रमाणपत्र समाज देतोय का? तिथला तहसीलदार लिहून भुजबळ ला देत आहे. याची चौकशी होऊ द्या खर खोटं होऊ द्या. १३ – १४ पर्यंत आम्ही विधानसभेचे काही बोलत नाही.”

हे ही वाचा

शिक्षकांवर शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde गंभीर यांच्यावर आरोप

आरक्षणाचा मुद्दा पेटला पण “दादा” गेले कुणीकडे ? Ajit pawar झाले नॉटरिचेबल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss