Saturday, July 6, 2024

Latest Posts

Maratha Reservation मिळवल्याशिवाय माघार नाही, Manoj Jarange Patil यांचे Maha Govt ला आव्हान

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी, "समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे. आरक्षणाशिवाय सुट्टी नाही आरक्षण घेतल्या शिवाय मागे येणार नाही," असे वक्तव्य केले.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल (गुरुवार, १३ जून) आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी राज्य सरकारच्या (Maharashtra Govenment) वतीने अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगेसोयरेंच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपोषण स्थगित करत राज्य सरकारला १ महिन्याचा अवधी दिला आहे. त्यानंतर, आज (शुक्रवार, १४ जून) मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे. आरक्षणाशिवाय सुट्टी नाही आरक्षण घेतल्या शिवाय मागे येणार नाही,” असे वक्तव्य केले.

यावेळी ते म्हणाले, “माझी तब्येत बरी नाही चालायला फिरायला त्रास होतो. सरकारने दगाफटका होऊ देऊ नका गरिबांचे मुलं मोठे झाले पाहिजे. मला राजकारणात जायचे नाही, समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरू केला आहे. आरक्षणावर आम्ही ठाम आहे आता धोका बसला तर हा समाजाला मोठा धोका असणार आहे. विधानसभा निवडणूक लढणार कि नाही ते या निर्णयावर अवलंबून आहे. आम्हाला ओबीसीतुन आरक्षण पाहिजे. जर ओबीसी मधुन आरक्षण मिळाले नाही तर कोणाला पाडायचे कोणाला निवडणून आणायचे हे ठरवू.”

“समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे. कुणीही द्यावे पण आम्हाला आरक्षण द्यावे कोणाचेही सरकारने आरक्षण द्यावे. शंभुराज देसाई यांनी सांगितले की मुंबईत बैठक आहे. त्यानंतर जोमाने कामाला लागणार आहे. आरक्षणाशिवाय सुट्टी नाही आरक्षण घेतल्या शिवाय मागे येणार नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

काहीजण Manoj Jarange Patil यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारला लक्ष करत आहेत, Pravin Darekar यांची टीका

Manoj Jarange Patil यांचे उपोषण स्थगित, Maha Govt समोर ठेवल्या या प्रमुख मागण्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss