Sunday, July 7, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil यांचे उपोषण स्थगित, Maha Govt समोर ठेवल्या या प्रमुख मागण्या

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे काही प्रमुख मागण्या देखील ठेवल्या.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज (गुरुवार, १३ जून) आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी राज्यसरकारच्या वतीने आज अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगेसोयरेंच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपोषण स्थगित करत राज्य सरकारला (Maharashtra Govenment) १ महिन्याचा अवधी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी यावेळी मोठी घोषणा करत ‘पुढील एक महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचे’ त्यांनी सांगितले. शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्युस पिऊन आपले उपोषण मागे घेतले. त्यांच्या उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून अंतरवाली सराटी येथे जोरदार घोषणाबाजी आणि जालोष करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे काही प्रमुख मागण्या देखील ठेवल्या.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या:

  • मराठ्यांना ओबीसींमधून सरसकट आरक्षण द्यावे.
  • ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
  • ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्रक लिहून घेऊन कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
  • कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिक्षण मोफत करा.
  • मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहे बांधावीत.
  • मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती थांबवावी. अथवा मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवाव्यात.
  • मराठा आंदोलकांवरील राज्याभरातील गुन्हे मागे घ्यावेत.
  • SEBC अंतर्गत २०२४ च्या नियुक्त्या त्वरित द्याव्यात.
  • वर्ग १ व वर्ग २ तसेच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्याव्यात.
  • ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदी लावाव्यात.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांचे उपोषण स्थगित, Maha Govt ला दिला एक महिन्याचा अवधी

Sunetra Pawar होणार खासदार, राज्यसभेवर झाली बिनविरोध निवड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss