Sunday, July 7, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil यांचे उपोषण स्थगित, Maha Govt ला दिला एक महिन्याचा अवधी

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज (गुरुवार, १३ जून) आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी राज्यसरकारच्या वतीने आज अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज (गुरुवार, १३ जून) आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी राज्यसरकारच्या वतीने आज अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगेसोयरेंच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपोषण स्थगित करत राज्य सरकारला (Maharashtra Govenment) १ महिन्याचा अवधी दिला आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सगेसोयरेंच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काम चालू असल्याचे सांगत सरकारला दोन महिन्यांचा अवधी देण्याची मागणी केली. यावेळी ते म्हणाले, “मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही सरकारला दोन महिन्यांचा कालावधी द्यायला हवा,” अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एका महिन्याचा कालावधी देत आपले आमरण उपोषण स्थगित केले.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी यावेळी मोठी घोषणा करत ‘पुढील एक महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचे’ त्यांनी सांगितले. शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्युस पिऊन आपले उपोषण मागे घेतले. त्यांच्या उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून अंतरवाली सराटी येथे जोरदार घोषणाबाजी आणि जालोष करण्यात आला.

याअगोदर शंभूराज देसाई म्हणाले, “शिवाजी महाराज यांच्या साक्षीने मागण्या मान्य करणार असून जरंगे पाटील यांनी उपोषण स्थगित करावं. एसआयटी बाबत माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे. सगेसोयऱयांच्या अंमलबजावणीबाबत सरकारची मानसिकता नाही, हे जरांगे यांनी डोक्यातून काढून टाकावं. शिंदे साहेबानी त्यांचा शब्द दिला आहे. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीतून सोडवू. त्याला इतरांचा विरोध व्हायला नको,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

नाराज Chagan Bhujbal जाणार मातोश्रीकडे? सुनेत्रांच्या राज्यसभेने पक्षात कचकच

Sunetra Pawar होणार खासदार, राज्यसभेवर झाली बिनविरोध निवड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss