Manoj Jarange Patil त्यांनी पुन्हा उचलली उपोषणाची तलवार, मराठा आरक्षणासाठी २९ सप्टेंबरपासून करणार आमरण उपोषण

Manoj Jarange Patil त्यांनी पुन्हा उचलली उपोषणाची तलवार, मराठा आरक्षणासाठी २९ सप्टेंबरपासून करणार आमरण उपोषण

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाची तलवार उचलली आहे. २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण (Hunger Strike) करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. अंतरवाली सराटी येथे त्यांनी आज हा निर्णय घेतला आहे मात्र त्यांच्या या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध केल्याचे पाहायला मिळाले. जरांगे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती उपस्थितांनी यावेळी केली.

आज (गुरुवार, २९ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आमच्या लहानपणी आम्ही मराठा समाजाला हिणवलेलं पाहिलेलं आहे. नासके लोक मराठा समाजाची टिंगल करायचे, त्यामुळे समाज एकत्र का येत नाही असं वाटायचं. सगळेच लोक स्वार्थी झाले, तर समाज कसा पुढे जाईल. समाज एक का येत नाही की कुणी येऊ देत नाही, हा प्रश्न मलाही पडायचा. त्यामुळे समाजासाठी टोकाची लढाई लढण्याचा निर्णय मी घेतला. आपली चटणी भाकरचं बरी हा निश्चय केला आणि पैठण फाट्यापासून लढाई गेल्यावर्षी सुरू केली,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “फडणवीस यांना मराठ्यांचा तिहेरी फटका बसला आहे, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलीडिटी देत नाही. EWS आरक्षण कुणबी आरक्षण कोणतंही होऊ दिलं नाही. कुणबी नोंदी ते शोधू देत नाही. कॉंग्रेसचे आधी जसे हाल झाले होते, तसे भाजपचे होईल. शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही ही समिती रेकॉर्ड तपासत नाही, सगे सोयरे अंमलबजावणी केली नाही. गिरीष महाजन म्हणजे १५ रुपयांचा बेल्ट आहे, सरसकट आरक्षण म्हटल्यावर त्याचं पोट दुखतं. सगे सोयरे आरक्षण कायद्यात बसत नाही म्हणता मग तुम्ही राज्यपालांच्या स्वाक्षरीने अधिसूचना काढली कशी? टिकत नव्हती तर तेव्हाच काढायची नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचा ओएसडी चिवटे पक्का जातीयवादी आहे. तो आमचे बलिदान गेलेल्या लोकांचे पैसे रोखून धरतो,तू काळजी करू नको, बदल होईल मग बदला घेऊ,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Rajkot Fort: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यासंबंधित चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त

Rajkot Fort Dispute: कोंबडी चोरांना आम्ही घाबरत नाही, Aaditya Thackeray यांचा राणेंना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version