Monday, July 1, 2024

Latest Posts

‘१३ तारखेला धमाका होणार आहे’ Manoj Jarange यांचा इशारा

दुसरीकडे इतर ओबीसी नेते यावर विरोध करत असून ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) इतर वाटेकरी नको अशी मागणी करत आहेत. राज्यात आरक्षणप्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच आज (सोमवार, २५ जून) मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली.

राज्यात आरक्षणावरून मराठा ओबीसी (OBC) वादावर जोरदार खडाजंगी चालू आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसींमधून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे इतर ओबीसी नेते यावर विरोध करत असून ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) इतर वाटेकरी नको अशी मागणी करत आहेत. राज्यात आरक्षणप्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच आज (सोमवार, २५ जून) मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांसह मराठा नेत्यांवरसुद्धा टीका केली. यावेळी ते म्हणाले, “ ठासून सांगतो, एकटा जरी राहिलो तरी लढणार,” असे वक्तव्य देखील त्यांनी केले.

आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, एकट्याचा अर्थ आम्हांला काढायला लावू नका. आपल्या समाजासाठी चार शब्द काही ऐकून घ्यायचे असतात आणि सोडून द्यायचे असतात. जे आजूबाजूला गेले, ते मला सुद्धा किती घाण- घाण बोललेले आहेत. समाजाचा लढा मोठा आहे. द्यायचं सोडून आणि चालायचं पुढं. झाला अपमान तर जातीसाठी पचवू. ओबीसींचे नेते एक झाले आहेत. मी एकटा पडलो आहे. मराठ्यांचे नेते काय करत आहे. आमचा मराठी समाज हा मरेपर्यंत एक आहे. ठासून सांगतो, एकटा जरी राहिलो तरी लढणार. आमचे पण लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत जागे झाले आहेत.’

पुढे लक्ष्मण हाकेंविषयी (Laxman Hake) भाष्य करताना मनोज जरांगे म्हणाले,’ मी धनगर नेते, गाव खेड्यातल्या, ओबीसी लोकांना विरोधक मानलं नाही. त्यांना दुखावलं नाही, अन् दुखावणार पण नाही. कुणी खोट्या बातम्या पसरवू नये. १३ तारखेला धमाका होणार आहे. एका मागणीत फसवलं तर दुसरी आहेच. मला वेड्यात काढायचं काम करायचं नाही. मराठा आणि कुणबी एकचं आहे, हे कायदा सांगतो. खोटं बोलून किती आंदोलक संपवले, हे मला ठाऊक आहे. मराठ्यांसमोर डाव टाकू नका. आम्ही जातवान मराठी शेतकरी आहे.’ असे वक्तव्य त्यांनी केले. आता मराठा आणि ओबीसी मधला हा वाद कुठले वळण घेतोय याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss