spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनोज जरांगे यांनी सरकारला दिला इशारा

मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत.

मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. त्यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. या अल्टिमेटला तीस दिवस पूर्ण झाले आहेत. आता फक्त सरकारकडे ८ दिवसांचा कालावधी उरला आहे. या ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर २४ ऑक्टोबर नंतरचे आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

आधी सत्ताधाऱ्यांनी मला उपोषणाला बसवलं म्हणत होते. आता म्हणतात विरोधकांनी उभं केलय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं. तर, सरकारने आमच्याकडे चाळीस दिवस घेतले आहे. त्यामुळे आरक्षण द्या, समितीला पुरावे सापडायला लावू नका. तुम्हाला ५००० पानांचा आधार मिळाले असून, त्या आधारे आरक्षण दिले पाहिजे. ४० दिवसांची मुदत संपल्यावर २४ तारखेनंतर होणार आंदोलन देखील शांत पद्धतीनेच असेल. मात्र, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारला वेळ नाही ते बिझी असतं, काय करतात ते त्यांचे त्यांनाच माहित आहे. राज्यातली जनता काय ओरडते, बोंबलते किंवा सामान्य मराठा आंतरवालीत आला होता, त्याचं त्यांना काही देणं घेणं नाही. जनतेचे देणे घेणे नाही. आम्हाला आता त्यांनी विचारू नये. ४० व्या दिवशी आम्हाला आरक्षण द्यावे, असे देखील ते बोले आहेत. विजय वड्डेटीवारांनी एकीकरण कराव. सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत. सगळ्या जनतेला न्याय द्यायचं हे त्यांचं काम आहे. जनतेचा आवाज व्हायचं काम विरोधी पक्षनेत्याच असतं. ती शक्ती एका जातीकडे जात असेल तर हे त्यांना शोभत नाही. ते आमच्याकडे आले होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या हे सांगणारे धाडसी माणूस तेच होते. त्यामुळे तुम्ही सरकारला धारेवर धरा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. तसेच, भाजपाचे ओबीसी सेल आणि विरोधी पक्ष आज एकत्र बसलेत. मग, मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ म्हणत सर्वपक्षीय ठराव का घेतला होता? असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

 उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणतात, ते देणारच. तसेच सत्ताधाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. आंदोलकाची भूमिका अशी असते की, जो कोणी आलं त्याच्या पाठिंबा स्वीकारायचा. ओबीसी बांधवांना माझी विनंती असून, आमच्या गोरगरिबांचा प्रश्न आहे. आमच्या ताटात आणण्यासाठी आम्हाला साथ द्या, माती टाकू नका. आम्ही तुमचं काही केलं नाही. या नेत्यांचं ऐकू नका, राज्य आपला आहे. तसेच सदावर्ते यांच्यावर मला काहीच बोलायचे नाही, असे जरांगे म्हणाले.

हे ही वाचा: 

बनावट जात प्रमाणपत्र वापरून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बाप-लेकीविरोधात सायनमध्ये गुन्हा

प्रदूषणापासून नुकसान होणाऱ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss