मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर आले होते.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर आले होते. त्यावेळी सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यांना सरकारकडून आद्यदेश देण्यात आला होता. पण त्या आद्यदेशावर अमंलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र आज त्यांची प्रकृती खालावली आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आज सकाळपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. महिलांनी रडारड करायला सुरुवात केली होती. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने उपोषणस्थळी आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

काल संध्याकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. खासगी डॉक्टरांचे एक पथक आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टरांनी जरांगे ने विनंती केली मात्र तरीसुद्धा ते कोणाचं ऐकले नाही. मनोज जरांगे यांना काही जवळचे सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी समजवल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास होकार दिला. डॉक्टरांनी त्यांना तातडीने सलाईन लावली आहे. तसेच त्यांना इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन देखील दिले आहे. मनोज जरांगे यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी डॉक्टरांनी तपासली. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे.

मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे बीडमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आळंदी, पुरंदर, बारामती, सोलापूर, मनमाड याठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरात आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे तसाच पाठिंबा ग्रामीण भागात देखील मिळत आहे.

हे ही वाचा:

‘सिंगम ३’ मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायकाची भूमिका, व्हिलन लूक झाला आउट

‘काही लोक इतिहासातून शिकतात’…शिल्पा शेट्टीनी राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेबाबत नरेंद्र मोदींना लिहेले पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version