मराठा आरक्षणासाठी मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती नकोच ,मनोज जरांगे यांची नवीन मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती नकोच ,मनोज जरांगे यांची नवीन मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात नोकरभरती करू नयेत, अशी नवीन मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये बोलताना मनोज जरांगेनी ‘मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती कर नयेत’ असा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या या मागणीला मराठा बांधवांनी होकार दर्शवला आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लेकरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या राज्यात नोकरभरती करायची नाही. जर, तुम्हाला नोकरभरती करायची असेल, तर मराठ्यांना काही हरकत नाही. मराठे कुणाच्याही लेकरांचं वाटुळं होऊ देणार नाही. पण, नोकरभरती करण्याचा निर्णय घेतांना मराठ्यांच्या सर्व जागा राखी ठेवून नोकरभरतीचा निर्णय घ्या, तर आम्हाला मान्य आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

प्रकाश सोळुंकेंच्या घरावर हल्ला करणाऱ्या १७ आरोपींचा जमीन मंजूर

ठाण्यात आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन, भुजबळांची तोफ कोणावर धडाडणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version