जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आले समोरासमोर

जालन्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीत अडवलं. बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला. त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले.

जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आले समोरासमोर

जालन्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीत अडवलं. बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला. त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळीच घोषणाबाजी झाली. रात्री उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवलीकजे येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. १५ मिनिटात बॅरिकेटिंग काढा अन्यथा तेचं बॅरिकेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना फोन केला. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग हटवलं.

मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. दोन्ही बाजूच्या आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. वडीगोद्री येथून मनोज जरांगे यांच्या आंदोलकांच्या दिशेला गाड्या जात होत्या. त्याच दरम्यान आमच्या गाड्या सोडत नाहीत आणि त्यांच्या गाड्या का सोडतात? या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले.

लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या दोघांचे उपोषस्थळ जवळ-जवळ सुरु आहे. त्यामुळे दोन्ही समाजाचे आंदोलक तिथे जमत आहेत. अनेक वेळा कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हजारो पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरात लागलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची आज प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत. अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जिथे उपोषण सुरु आहे, तिथूनच रस्ता जातो. त्यामुळे त्या रस्त्याने मराठा आंदोलकांच्या गाड्या जात आहेत. यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये तिथे घोषणाबाजी होताना दिसत आहे. असं असताना पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल आहे.

हे ही वाचा:

तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI…

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version