मर्यादा संपल्यानंतर मराठा परफेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

मर्यादा संपल्यानंतर मराठा परफेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. ”मर्यादी संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात”, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकून आम्ही त्यांना सहा महिन्यांचा वेळ दिला, पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात. ९ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार. त्यानंतर काय निर्णय घ्याचा ते घेऊ. समाजाचे म्हणणे आहे की तुम्ही उपोषण करू नका. समाजाच्या विरोधात जाऊन राजकीय अस्तित्व निर्माण करता येणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावे. सहा महिने तुम्ही आमचे फुकटचे घालवले आहात, आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू ते तुम्हाला दाखवून देऊ,असे मनोज जरांगे म्हणाले. ज्वलंत मराठा समाजाला अंगावर घेऊन, सरकार निवडणुका घेणार नाही. निवडणूका होणारच नाही तर मराठा मतदान कोणाच्या बाजूने देणार हा प्रश्नच नाही. सरकारने जाणीवपूर्वक खोटे आरोप केले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना गुंतवायला सुरुवात केली आहे. सगेसोयऱ्यांच्या संदर्भात अधिसूचना काढली आहे, मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. दहा टक्के आरक्षण देऊन समाज समाधानी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. माझा राजकीय मार्ग नाही. पण मराठ्यांचा इतका ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका घेणार नाही. शेकडोंची उमेदवारी दाखल करण्यासंदर्भात समाजाने निर्णय घेतला आहे, तो निर्णय समाजाचा आहे. तर, मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

आजूबाजूला फिरणारे भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्यावर एसआयटी लावायला हवी,पण त्यांनी माझ्यावर लावली. मी पळून जाणारा नाही. फडणवीस साहेब मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत पळणार नाही. बीडमध्ये ३४०४ फॉर्म भरण्यासाठी तयार झाले आहेत. लोकसभेला इतके उमेदवार झाले की यांचे चिन्हचं दिसणार नाहीत. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आधी २ कोटी मराठा घेऊन आलो आता ४ कोटी मराठा घेऊन येऊ, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

Shivajirao Adhalarao Patil यांची उमेदवारी निश्चित ?, एकाच गाडीतून केला प्रवास

महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासण्याचे काम करणारे ते आमदार कोण ?, काँग्रेस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version