Marathwada Vidarbha Earthquake: नांदेड, परभणी हादरली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Marathwada Vidarbha Earthquake: नांदेड, परभणी हादरली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Marathwada Vidarbha Earthquake: विदर्भातील एका जिल्ह्यात तर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) या तीन तर विदर्भातील वाशिम (Washim) या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही पण यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळी सात वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवले. परभणी शहर (Parbhani City), सेलू, गंगाखेड या ठिकाणी भूकंप झाला. भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये 7:15 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये भूकंप झाल्यामुळे नागरिक घाबरले होते. हिंगोली (Hingoli) मध्ये झालेला भूकंप हा 4.5 रिश्टर स्केल इतका होता. यासोबतच मराठवाड्यालगत असलेल्या वाशिम (Washim) मध्ये सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी त्यानंतर सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. जयपुर, सावळी कृष्णा या गावांमध्ये पत्र्याचा मोठा आवाज झाला. तसेच गोठ्यामध्ये बांधलेली जनावरे देखील भूकंपामुळे भयभीत झाली होती. मराठवाड्यातील नांदेड (Nanded) तसेच जालना (Jalna) जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड (Nanded) जिल्ह्यात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी अंबड, घनसावंगी, परतुर तालुक्यातील काही भागात भूकंप (Earthquake) झाला.

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version