वसईमधील वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट

वसई येथील नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

वसईमधील वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट

वसई येथील नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात कामगार जखमी झाले आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले. यातील सात जण जखमी झाली आहेत. वैष्णवी, भावेश, जयदीप राव, सागर, हर्षला व अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. तर अजय व अन्य दोन जणांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी पाठविले आहेत. तसेच याप्रकरणी वालीव पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. या स्फोटाची भीषणता इतकी होती की त्याचे हादरे आजूबाजूच्या परिसराला बसले.

हे ही वाचा:

Mahesh Babu: अभिनेता महेश बाबूच्या आई इंदिरा देवींचे झाले अल्पशा आजारामुळे निधन

World Heart Day 2022 : हृदयाच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलचा एक अनोखा प्रयोग

Festival holidays : बच्चे पार्टीसाठी खुशखबर, ऑक्टोबर महिना घेऊन येतोय तब्बल १० दिवसांची शालेय सुट्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version