spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात हॉटेलला भीषण आग; सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका

पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोळ पसरत आहे. आग इतकी भीषण आहे यामुळे टेरेसचेही मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना आहे. मंगळवारी सकाळीच या इमारतीच्या वरच्या भागातील मजल्यांवरून आधी धुर निघाल्याचं प्रत्यक्ष दर्शींना दिसलं. त्यानंतर याच ठिकाणाहून मोठ-मोठे आगीचे लोळ उठताना दिसले. आग पसरू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुण्यातील लुल्लानगर भागातील झीके (जहीर खान) हॉटेलला आज (मंगळवार) सकाळी आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. सात मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ही संपूर्ण काचेची इमारत असल्याने इमारतीमध्ये मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे. धूर बाहेर पडण्यास पुरेसी जागा नसल्याचे दिसत आहे. परिणामी धूर बाहेर पडावा यासाठी इमरातीच्या काचाही फोडल्या जात आहेत. या इमरतीतमध्ये विविध कार्यालये तसेच सराफा व्यावसायिकांची दुकानेही आहेत.

आग लागलेल्या इमारतीत अनेक दुकाने, ऑफिस, आणि सोन्याची दुकाने आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण आग भीषण असल्यामुळे हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होत आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हे ही वाचा :

सामान्य जनतेला दिलासा; LPG Gas सिलेंडर आजपासून ११५ रुपयांनी स्वस्त

सीटबेल्ट संदर्भात मुदतवाढ, तुर्तास समज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss