मुंबईत गोवरचा उद्रेक, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू, नाशिकमध्ये रुग्ण आढळले

राज्यात गोवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत गोवरमुळे १० बालकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत गोवरचा उद्रेक, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू, नाशिकमध्ये रुग्ण आढळले

राज्यात गोवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत गोवरमुळे १० बालकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई (Mumbai), मालेगाव (Malegaon) पाठोपाठ नाशिक (Nashik) शहरात देखील गोवरचे (Gover) ४ संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून या ४ संशयित बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला आले पाठवण्यात आल्याचे समजते आहे. मालेगावनंतर नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढल्याने आरोग्य विभाग (Health Department) अलर्ट झाले आहे. यामुळे आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज मंत्रालयात यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे

दरवर्षी साधरणतः जानेवारी ते मार्च दरम्यान गोवरची साथ येते. मात्र यंदा हवामानातील बदलामुळे लवकर साथ आली असून त्यापासून बालकांचा बचाव करण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मालेगाव शहराच्या बालकांना गोवरने ग्रासले आहे. यातील अनेक बालकांना गोवर प्रतिबंधक रूबेला लसीकरण करून घेतले नसल्याचे चौकशी अंतिम आढळून आले आहे. एका विशिष्ट भागातील बालकांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे आता अशा बालकांवर तातडीने लसीकरण हाती घेण्यात आले आहे. रुग्णांमध्ये तीव्र ताप शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षण दिसतात. यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन नाशिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा गोवरचा आजाराने हात पसरवण्यास सुरवात केली आहे. मुंबई शहरात सुरवातीला आढळून आलेल्या रुग्णानंतर मालेगाव शहरात गोवरचे संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता नाशिक शहरात गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नाशिक शहरात गोवरचे ४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना देखील सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये ५० हुन अधिक संशयित रुग्ण आढळून आले होते. मात्र नाशिक शहरात एकही रुग्ण आढळला नव्हता. आता मात्र ४ संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग शहरात सर्वेक्षण करणार आहे. आरोग्य विभागाने शहरात केलेल्या तपासणीत ४ संशयित आढळून रुग्ण आले आहेत. हे रुग्ण संशयित असले तरी नागरिकांनी बालकांच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोवर झाल्यासारखे वाटले तर त्वरित उपचार घ्यावेत, मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

हे ही वाचा : 

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा बचाव करणारे सीमावासियांना काय न्याय देणार? राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुलाची हत्या की आत्महत्या?,खुलासा करावा; महाजनांच्या टीकेवर एकनाथ खडसे संतापले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version