spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

गेल्या काही दिवसांपासून बनावट औषधांची प्रकरणे हि मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. बनावट औषधांमुळे अनेक वेळा रुग्णांना शारीरिक समस्या जाणावतात. बनावट औषधं ओळखण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा किंवा सुविधा ग्राहकांकडे नाही.

गेल्या काही दिवसांपासून बनावट औषधांची प्रकरणे हि मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. बनावट औषधांमुळे अनेक वेळा रुग्णांना शारीरिक समस्या जाणावतात. बनावट औषधं ओळखण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा किंवा सुविधा ग्राहकांकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच औषधांबाबत एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लवकरच औषधांची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड ही सुविधा आता येणार आहे.

औषध खरे की बनावट याची सत्यता पडतळण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन (Medicine QR Code) केल्यानंतर तुम्हाला औषधांची सविस्तर माहिती मिळणार आहे. सुरुवातीला ठराविक औषधांसाठी हा प्रयोग केला जाईल. ज्यात १०० रुपयांहून अधिक किंमतीच्या औषधांचा समावेश असेल. तसंच सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या औषधांसाठी लवकरात लवकर क्यूआर कोड कार्यन्वित केला जाईल. खरं तर अनेक वर्षांपासून या प्रयोगाची अंमलबजावणी प्रतीक्षेत आहे.

बनावट आणि निकृष्ट दर्ज्याच्या औषधांचा वापर रोखण्यासाठी आणि औषधांची सत्यता पडताळण्यासाठी ‘ट्रॅक अँड ट्रेस’ ही यंत्रणा सुरु करण्याची सरकारची योजना केली आहे. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात फार्मास्युटिकल कंपन्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या ३०० औषधांच्या प्राथमिक उत्पादन पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा QR (क्विक रिस्पॉन्स-QR) कोड लावतील. प्राधमिक उत्पादनांमध्ये बाटल्या, कॅन, जार यांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होणार आहे.

गेल्या काही वर्षांत बाजारात बनावट आणि निकृष्ट औषधांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.त्यापैकी काही राज्य औषध नियामकांनी जप्तही केले आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने या महत्त्वाच्या योजनेच्या दिशेने पावले उचलली आहेत. एकदा ही प्रणाली लागू झाल्यानंतर ग्राहक मंत्रालयाने विकसित केलेल्या पोर्टल औषधाला एक युनिक आयडी कोड देऊन त्याची सत्यता पडताळण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यानंतर मोबाईल फोन किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे याची सत्यता पडताळणे सोपे होणार आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही : रोहित पवार

एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया; सहानुभूती मिळवण्यासाठी….

Uddhav thackeray : ‘मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो’; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर लॉन्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss