spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MPSCकडून मेगा भरती घोषणा, तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती

या पदांच्या भरतीबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

एमपीएससी म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठी घोषणा केली आहे. २०२३च्या या वर्षात आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी घोषणा केली आहे. या पदांच्या भरतीबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. महाराष्ट्र अराजपात्रिक गट ब आणि गट क सेवा संयुक्त २०२३ मधून ही भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र अराजपात्रिक गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२३ करीता ही भरती असून ३० एप्रिल २०२३ रोजी ही भरती होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्ह्यातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर अराजपत्रिका गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर गट क सेवा संयुक्त परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.

एमपीएससी अंतर्गत भरली जाणार पुढील पदे…

  • सहाय्यक कक्ष अधिकारी – ७८
  • राज्य कर निरीक्षकची – १५९
  • पोलीस उप निरीक्षकची – ३७४
  • दुय्यम निबंधकची – ४९
  • दुय्यम निरीक्षक –  ६
  • तांत्रिक सहाय्यकचे – १
  • कर सहाय्यकची – ४६८
  • लिपिक टंकलेखकची  – ७०३४

कोणत्या पदासाठी किती पगार …

  • सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि दुय्यम निबंधक-मुद्रांक निरीक्षक – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८०० रुपयांपर्यंत.
  • दुय्यम निरीक्ष, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील गृह विभाग – दरमहा३२ हजार ते १ लाख १ हजार ६०० रुपयांपर्यंत
  • लिपिक टंकलेखक – १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपयांपर्यंत.

यासाठी उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवाराना एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

हे ही वाचा:

डीजीसीएने केली मोठी कारवाई, एअर इंडियाला ३० लाखांचा दंड तर पायलटचा परवानाही केला रद्द

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला तारे-तारकांचा मेळा, शाहरुख-सलमानसह या स्टार्सनी लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss