MPSCकडून मेगा भरती घोषणा, तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती

या पदांच्या भरतीबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

MPSCकडून मेगा भरती घोषणा, तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती

एमपीएससी म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठी घोषणा केली आहे. २०२३च्या या वर्षात आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी घोषणा केली आहे. या पदांच्या भरतीबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. महाराष्ट्र अराजपात्रिक गट ब आणि गट क सेवा संयुक्त २०२३ मधून ही भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र अराजपात्रिक गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२३ करीता ही भरती असून ३० एप्रिल २०२३ रोजी ही भरती होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्ह्यातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर अराजपत्रिका गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर गट क सेवा संयुक्त परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.

एमपीएससी अंतर्गत भरली जाणार पुढील पदे…

कोणत्या पदासाठी किती पगार …

यासाठी उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवाराना एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

हे ही वाचा:

डीजीसीएने केली मोठी कारवाई, एअर इंडियाला ३० लाखांचा दंड तर पायलटचा परवानाही केला रद्द

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला तारे-तारकांचा मेळा, शाहरुख-सलमानसह या स्टार्सनी लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version