Megablock Special; मुंबईकरांसाठी खास बातमी ..

आज म्हणजे २३ जून रोजी या सर्व लाईनवर मेगाब्लॉक असणारे आहे. त्याचे कारण असे की या ठिकाणी अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यात येणार आहेत.

Megablock Special; मुंबईकरांसाठी खास बातमी ..

मुंबई म्हंटल तर स्वप्ननगरी म्हंटल तर घड्याळाच्या काट्यावर चालणारी नगरी. इथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. वेळ असो व नसो , लेट होऊ देत अथवा नको पण ट्रेन चुकता काम नये. जर का एक ट्रेन चुकली तर पुढची सर्व गणित चुकतात. एकदा का गणित चुकली की कमवर पोहोचायला उशीर, महत्वाची कामे उशिराने करावी लागतात. मग एकदा का वेळ निघून गेला की तो काही परत येत नाही. त्यात जर का ट्रेनचे गणित वर खाली झाले तर मग बघायलाच नको. त्यामुळे सर्व मुंबईकरांनी आज जर कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे.

आपली सर्व कामे वेळेत व्हावीत म्हणून आजच्या कामाचं नियोजन थोड बदलून लोकल च्या वेळापत्रकानुसार करावे लागणार आहे. कारण आज पश्चिम, मध्य आणि हरबल लाईन वर मेगब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे.

आज म्हणजे २३ जून रोजी या सर्व लाईनवर मेगाब्लॉक असणारे आहे. त्याचे कारण असे की या ठिकाणी अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. हे सर्व मेगाब्लॉक सकाळी १० ते संध्याकाळी ५ या सुमारास असणार आहेत. एकंदरीत सर्व रेल्वे गाड्या चालू असतील परंतु त्यातील काही ठराविक वेळेतील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गाडी ही किमान १५,२० मिनिट लेट असतील.

कुठे कुठे असेल मेगाब्लॉक?

रेल्वेचे वेळापत्रक कसे असेल ?

  1. मध्य रेल्वे डाऊन धीम्या मार्गावर (Central Relway):

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या वेळेतील धीम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटणारी ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावरील
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३२ वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल.

२. मध्य रेल्वे अप धीम्या मार्गावर:

  1. हार्बर रेल्वे डाऊन हार्बर मार्गावर :

२. अप हार्बर मार्गावर (Harbal Line):

अशा प्रकारे आज म्हणजे २३ जून २०२४ रोजी रेल्वेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आजचे त्यांच्या कामाचे वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे.

हे ही वाचा

महाविकास आघाडीशी साधली जवळीक; महायुती ने केली कारवाई !

“संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत ते झालंच पाहिजे” ; PANKAJA MUNDE यांनी दिली प्रतिक्रिया

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version