spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’चा लवकरच पहिला टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ट्रायल रन

मुंबई मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ चाचणी अखेर आज मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता एका सोहळ्यात चाचणीला सुरुवात झाली. कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-३ चे मे २०२१ अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम ६७ टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-३ चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो – ३ ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

सर्वोच्च न्यायलयात आज एकूण ८ प्रलंबित खटल्यांवर दोन घटनापीठे सुनावणी होणार

एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना दुसरीकडे आज मेट्रो ३ ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रेक मुंबईत दाखल झाले आहेत. आज सकाळी आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत चाचणीस सुरुवात करण्यात आली. सारीपूत नगर ते मरोळ अशी तीन किमीपर्यंत पहिली चाचणी होईल. त्यानंतरचाचणी सुरूच राहील. एकूण १० हजार किमीपर्यंतची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढे सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss