spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवाजी महाराजांच्या मूर्तीमुळे अडवले जायचं तिरुपतीत टोलनाक्यावर; मिलिंद नार्वेकरांनी घेतली दखल

देशातील धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं तिरुपती बालाजीला गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेल्या प्रत्येक गाड्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार समोर होत होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भातले व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. दरम्यान आता संस्थानाच्या समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या बद्दलचे स्प्ष्टीकरण देखील दिले आहे, आपल्या ट्विटर हान्डेलवरुन.

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेले तिरुपती वाहन टोल नाक्यावर अडवण्यात येत असल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर धर्मा रेड्डी जी यांची तिरुपती येथे भेट घेऊन अशा अवमानकारक वर्तणुकीबाबत स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. असल्याचे नार्वेकर म्हणाले.

यावर रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिले, “देवस्थान परिसरात हिंदू देवतांची व महापुरुषांच्या मूर्ती अडवल्या जात नसल्याचे सांगून हा गैरसमज असल्याचे स्पष्ट केले. तसेच या भेटीत मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आदरपूर्वक स्वीकार त्यांनी केला.

हेही वाचा : 

Eknath Shinde VS Udhhav Thackeray : सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद पूर्ण, पुढील सुनावणी उद्या

Latest Posts

Don't Miss