मंत्री Chhagan Bhujbal यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचा ई – गृहप्रवेश

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालय येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करत ई गृहप्रवेश करण्यात आला. त्याचबरोबर महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्काराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

मंत्री Chhagan Bhujbal यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचा ई – गृहप्रवेश

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालय येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करत ई गृहप्रवेश करण्यात आला. त्याचबरोबर महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्काराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, निसार शेख, गोरख शिंदे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी महेश पाटील, विस्तार अधिकारी बी. के.आहिरे, प्रशासन अधिकारी अण्णासाहेब पैठणकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम पुरस्कार अंदरसूल ग्रामपंचायत, द्वितीय पुरस्कार राजापूर ग्रामपंचायतीस वितरीत करण्यात आले. प्रधान मंत्री आवास योजना – सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार कोळगाव, द्वितीय नगरसूल व तृतीय पुरस्कार सोमठाण देश ग्रामपंचायतीस वितरीत करण्यात आला. राज्य पुरस्कृत योजना – सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार बाभूळगाव, द्वितीय धुळगाव व तृतीय देशमाने ग्रामपंचायतीस वितरण करण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकुल नांदेसर येथील नंदा सुनील कोकाटे, तळवाडे येथील अशोक काशिनाथ आरखडे, जुऊळ्के येथील राम किसान भडकवाड, नायगव्हाण येथील संतोष रतन मोरे, संदीप संतूजी पानपाटील या प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर राज्यपुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट घरकुल योजनेत आडसुरेगाव येथील शिवाजी लक्ष्मण गायकवाड प्रथम, भारम येथील आशाबाई वाल्मिक आहेर द्वितीय, जळगाव नेउर येथील दामू श्रीपत वाघ यांना तृतीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी निफाड तालुक्यातील प्रधान मंत्री ग्राम आवास योजनेतील दहा लाभार्थ्यांच्या घरकुलांचे ई गृह प्रवेश करण्यात आले.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version