MNS Raj Thackeray Live: राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्वाचा

MNS Raj Thackeray Live: राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्वाचा

नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक येथे राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सोशल मिडीयाच्या वापराबाबत भाष्य केले. सोशल मिडीयाचा वापर लोकांपर्यंत पोहचण्यासाठी करा, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या वापराबाबत कार्यकर्त्यांना तंबी दिली.

राज्यात जी मराठा आरक्षणावरून जी आश्वासनं दिली जातात ती सर्व खोटी आहेत. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. पण केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी असलेल्या जातींना आरक्षण द्यावं लागेल, जे नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो. आणि जाती भेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जातं, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु आहे. मी जरांगे-पाटील ह्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर सांगितलं होतं की आरक्षण मिळणार नाही. ह्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं नाही तर तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

दरवर्षी प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये मनसेच्या वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी मी तुम्हाला यश मिळवून देणारच, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली. राजकरणात टिकून राहण्यासाठी संयम गरजेचा असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींचं श्रेय आहेच पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्याचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मी फिरतोय. मागे कल्याण-डोंबिवलीचा दौरा केला. राजकारणाचा इतका विचका झाला आहे की, दौऱ्याच्यावेळी माय-माता समोर येतात, मायेने डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात “बाबा रे, विश्वास आता तुझ्यावरच आहे.” अशा भावना राज ठाकरे यांनी नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात व्यक्त केल्या. 

हे ही वाचा:

MNS Raj Thackeray Live: राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्वाचा

महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू – Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version