राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस तुरळक व मुसळधार पडणार असल्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवार ती अनंत चतुर्थीच्या दिवशी शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी सांगितले.

 हेही वाचा : 

अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणी, खा.नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा

या राज्यात पावसाची शक्यता

६ सप्टेंबर २०२२ : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया

७ सप्टेंबर २०२२ : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली

8 सप्टेंबर २०२२: पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली

९ सप्टेंबर २०२२ : सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, नांदेड

जागतिक साक्षरता दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

राज्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जनावेळी भाविकांनी नदीपात्रात काळजी घ्यावी. याच दरम्यान धरणांच्या पाणलोटातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने विसर्जनावेळी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी केली आहे.

आता कारमध्ये देखील सर्वाना सीट बेल्ट बंधनकारक – नितीन गडकरी

Exit mobile version