Sunday, July 7, 2024

Latest Posts

Monsoon session: पेपरफुटीबाबत अधिवेशनातच कायदा होणार, पेपरफुटीवर सत्ताधारी विरोधक आमनेसामने

पेपरफुटीचे पडसाद १ जुलै रोजीच्या विधिमंडळाच्या पाय-यांपासून थेट सभागृहात उमटले. कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केले विरोधकांनी नीट परीक्षेच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शेने केली. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केल्याने कामकाज सुरु होण्याअगोदरच विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधक परस्परांसोबत उभे ठाकलेले पहायला मिळाले. त्यानंतर पेपरफुटीचे  पडसाद विधानसभेच्या सभागृहातही उमटले. मृद व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अधिकारी गट ब व अराजपत्रित पदाच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

केंद्र सरकारने पेपरफुटीबाबतचा कायदा केला आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा याबाबतचा कायदा करण्याचा मनोदय मागील अधिवेशनात व्यक्त केला आहे. त्यासंदर्भातील आमची कार्यवाही सुरु आहे. मध्यंतरी यासंदर्भात एका शिष्टमंडळाने आमची भेट घेतली होती. या शिष्टमंडळाला सुद्धा याबाबतचे आश्वासन दिले होते. पावसाळी अधिवेशनात अधिवेशनात आम्ही पेपरफुटीबाबतचा कायदा आणणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर त्याचवेळी गट ‘क’ च्या जागा यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येतील, असेही सांगितले.

तलाठी भरतीमध्ये उत्तर चुकल्याने आपण ती परीक्षा रद्द केली. या परीक्षेच्या व्यतिरिक्त पेपरफुटीबाबत एकच गुन्हा दाखल झालेला आहे. त्याव्यतिरिक्त याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. सरकारने ७५ हजार भरतीची घोषणा केली होती. आमचे सरकार आल्यानंतर आतापर्यंत ५७ हजार ४०० नियुक्ती आदेश दिले आहेत. त्याशिवाय ज्यांची परीक्षा पूर्ण झाली आहेत. मात्र काहींना नियुक्ती पत्र द्यायचे आहेत, तसे १९ हजार ८५३ जण आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ७७ हजार ३०५ जणांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. कुठल्याही घोटाळ्याविना आणि गैरप्रकाराविना ही प्रक्रिया पार पडली आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. त्याशिवाय ३१ हजार २०१ परीक्षेचा प्रक्रिया सुरु असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली. त्यामुळे विक्रमी वेळेत १ लाख जणांची भरती प्रक्रिया करण्याचा एकप्रकारचा विक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तर भरती प्रक्रियेतील परीक्षा प्रक्रियेत यापुढे परीक्षा केंद्रावर उपजिल्हाधकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा विचार सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मी होम मिनिस्टर

उबाठा गटाच्या एका आमदाराने पेपरफुटीचे वाँटसअँप मॅसेज वाचून दाखवला. त्यावर  तुम्ही देखील कोणतीही शहानिशा न करता व्हॉटस अप मॅसेज वाचून दाखविला. त्यामुळे ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याचवर मी गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचवेळी मी गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.

हे ही वाचा:

Ambadas Danve यांचं निलंबन दुर्दैवी, विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा डाव: Sachin Ahir

आशय कुलकर्णीची ‘सुख कळले’ मालिकेत दमदार एन्ट्री!, सौमित्रच्या भूमिकेने येणार रंजक वळण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss