Sunday, July 7, 2024

Latest Posts

Monsoon Session: महाराष्ट्र कर्नाटक वाद आता रत्नागिरीच्या भर समुद्रात

रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर रित्या आलेल्या कर्नाटक मधील मच्छिमार ट्रॉलर्सनी महाराष्ट्राच्या मत्स्य विभागाच्या गचती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात आज विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावरून ही माहिती पुढे आली आहे यावर्षीच्या जानेवारी महिन्यात रत्नागिरीच्या समुद्रात असा हल्ला झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अन्य राज्यातील मच्छीमार  ट्रॉलर्स कडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून महाराष्ट्रातील मच्छीमारी नौका खलाशी व तांडेल यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वारंवार झाल्याचे ही निदर्शनास आल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे अंशतः खरे असल्याचे सांगितले रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर 23 मध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्च 21 मध्ये अन्य राज्यातील ट्रॉलर्स कडून महाराष्ट्राच्या गस्तीनौकेवर हल्ला केल्याची घटना घडली होती याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 अंतर्गत अनेक अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई केली जाते अशी माहिती ही सरकारच्या वतीने देण्यात आली.

हे ही वाचा:

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार विरोधी बाकांवर असतील – महेश तपासे

‘बिग बॅास’मध्ये कल्ला करायला येतोय, महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss