Monsoon session: आता पेट्या पाठवा.. खोक्यांनंतर आता पुन्हा पेटीची चर्चा….विधानपरिषद निवडणुकीचे वेध

Monsoon session: आता पेट्या पाठवा.. खोक्यांनंतर आता पुन्हा पेटीची चर्चा….विधानपरिषद निवडणुकीचे वेध

दोन वर्षांपूर्वी शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंड केल्यानंतर सुरत गुवाहाटी, काय झाडी काय डोंगर… ही वाक्ये चर्चेत आली. पण सर्वात जास्ती चर्चेत आले ते पन्नास खोके… एकदम ओके…अगदी लहान थोर व्यक्तींच्या तोंडीही खोके…ओकेची भाषा रुळली. खोक्यांच्या चर्चेमुळे पेटीची (एक लाख रुपये) मागणी कमी झाली. खोक्यांच्या तुलनेत पेटीची चर्चा कमी झाली. पण आज ४ जुलै रोजी विधानसभेत पेटी या शब्दाला एकदम मागणी आली.  एका तारांकित प्रश्नाची चर्चा थेट पेट्यांवर जाऊन पोहोचली. कारण विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जून रोजी मतदान आहे. या अकरा जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या (शुक्रवारी) अर्ज मागे घेण्याचे दिवस आहे. अर्ज मागे न घेतल्यास मतदान अटळ आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान झाले तर ‘घोडेबाजार’ होण्याची सर्वच राजकीय पक्षांना भीती आहे.   विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात ‘पेटी’ हा शब्द उच्चारताच सदस्यांमध्ये हास्याचा फवारा उडला.

त्याचे असे झाले की, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ‘टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ यंत्रणा सुरु करण्याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावरील  चर्चा खूपच लांबल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘प्रश्न घ्या’ असे सांगत प्रश्न थोडक्यात मांडण्यास सांगितले. त्यावर, ‘प्रश्न घेतो ना असे सांगत किशोर जोरगेवार म्हणाले,  अपक्षांच्या बाबतीत असे काय करता? रोहित पवार यांना बोलू दिले नाही. खरे तर त्यांना बोलू द्यायला पाहिजे होते. ते पेट्या पाठवतात सगळ्यांकडे असे सांगत त्यावर स्वतःच  आंब्याच्या पेट्या असा खुलासा करीत पुढे म्हणाले,  तरीही रोहित पवारांना बोलू दिले नाही. मी अपक्ष आहे. मला तर बोलू द्या. १२ तारखेला पुन्हा बोलायलाच लागणार आहे मला. १२ तारखेसाठी किती लोक बोलत आहेत. पण सभागृहात बोलू देत नाही तुम्ही..!’ अशी टोलेबाजी किशोर जोरगेवार यांनी केली. या टोलेबाजीवर सभागृहात हशा उसळला. तेवढ्यात एका सदस्याने  ‘पेट्या कशाच्या तेही सांगा’ असा आवाज खाली बसलेल्या आमदारांमधून आला. त्यावर,  ‘आंब्याच्या पेट्या. असे उत्तर किशोर जोरगेवार यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा एकदा दिले. आणि लगचेच ‘दुसऱ्या पेट्या पाठवल्या तरी चालेल ना.. आम्हाला काही अडचण नाही..’ असे टिप्पणी करताच सदस्यांमध्ये पुन्हा हास्याचा फवारा उडाला. सभागृहात चाललेल्या लांबलचक चर्चेला विनोदाची झालर लागल्याने सर्वच सदस्य काही मिनिटांसाठी हास्यकल्लोळात बुडून गेले.  

हे ही वाचा:

Health Is Wealth : Smart Phone ठरतोय घातक ; हातावर होतोय वाईट परिणाम

Nana Patole लढवणार MCA ची निवडणूक, ट्विट करत दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version