Thursday, July 4, 2024

Latest Posts

Monsoon Session: AMBADAS DANVE यांचे निलंबन हटवले, कामकाजात होणार सहभागी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा (Ambadas Danve) निलंबनाचा कालावधी कमी केला असून आता उद्यापासून म्हणजेच ५ जुलैपासून अंबादास दानवे हे कामकाजात सहभागी होणार आहेत. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिलगिरी व्यक्त केल्यांनतर त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला. त्यांच्या निलंबनाचा कालावधी ५ ऐवजी ३ दिवस करण्यात आला असल्यामुळे आता उद्यापासून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांची पावसाळी अधिवेशनाची विधानपरिषदेतील सत्ताधाऱ्यांसोबतची खडाजंगी पाहायला मिळणार आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) विधानपरिषद आमदार आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना प्रसाद लाड (Prasad Lad) यांना केलेली शिवीगाळ केल्याप्रकरणी मंगळवार, २ जुलै रोजी  विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले होते. तसेच त्यांना पाच दिवसांसाठी विधान भवन (Maharashtra Vidhan Bhavan) परिसरात फिरकण्यासदेखील बंदी घालण्यात आली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, १ जुलै रोजी लोकसभेत भाषण देत भाजपवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. याचा प्रत्यय महाराष्ट्र विधिमंडळातदेखील आला. लोकसभेत झालेल्या विषयावर भाजप आमदार प्रसाद लाड विधानपरिषदेत व्यक्त झाले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत ‘राहुल गांधी यांना इटलीला पाठवून द्या ‘ असे म्हटले होते. यावर, लोकसभेतील मुद्यावर बोलून विधानपरिषदेतील कामकाजात व्यत्यय आणण्याची गरज नसल्याचे अंबादास दानवे यांनी म्हणताच प्रसाद लाड यांनी दानवे यांच्याकडे हातवारे केले होते.

यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली होती. अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याने सभागृहात एकाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळाचे कामकाज थांबवले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले होते की, “माझा तोल सुटलेला नाही. माझ्यावर बोट केलं तर तोडण्याचा मला अधिकार आहे. मी विरोधी पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे. बाटगा प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? याबद्दल माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधानपरिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही. माझ्यातला शिवसैनिक जागा झाला… माझ्यावरसुद्धा केसेस आहेत. यांनी हिंदुत्वासाठी किती केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत,” अशी टीका त्यांनी केली होती.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss