Monsoon Update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कायम

अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Monsoon Update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कायम

Monsoon Update : महाराष्ट्र

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून गेल्या अनेक दिवसात दिवसात उत्तर महाराष्ट्र, घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहेत तर काही ठिकाणी नद्या भरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गोदावरी, भिमा, कोयना धरणाचा पाणीसाठा वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. सोमवारी सकाळी कोकणात ही पावसाचा जोर कायम होता. दुपार नंतर हळूहळू जोर कमी झाल्याचं दिसून आलं.
अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यात माथेरान १२३, चिपळूण ११३, गगनबावडा १०८, अक्कलकुवा १०१, इगतपुरी १३२, पेठ १२०, सुरगाणा १७३, त्रंबकेश्र्वर १८२ अशी पावसाची नोंद झाली आहे. तर जळगाव मधील हाथनेर धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे धरणाचे चार दरवाजे पूर्ण क्षमतेने तर दहा दरवाजे एक मीटर ने उघडण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील धो धो पाऊस बरसला. नंदुबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अजूनही जोरदार सरी कोसळत आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक येथे मुसळधार पाऊस पडला. नाशिक मध्ये सहा पूल पाण्याखाली गेले. धो धो बरसणाऱ्या पावसामुळे पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला आहे. पेठ तालुक्यात एकजण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Exit mobile version