नवरात्रोत्सवानिमित्त भगर खाल्ल्याने १०० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

नवरात्रोत्सवानिमित्त भगर खाल्ल्याने १०० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उपवासानिमित्त भगर खाल्ल्याने १०० पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाली आहे. नाळवंडी, जुजगव्हाण, पोळवाडी आणि पाली गावातील ग्रामस्थांचा यात समावेश आहे. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. सध्या सर्वच रुग्णांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अचानक शंभरहून अधिक रुग्ण आल्याने जिल्हा शैली चिकित्सक सुरेश साबळे यांनी देखील तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत स्वतः उपचार केले शंभरहून अधिक जण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे काही काळ त्यांची देखील धावपळ झाली होती. दरवेळेस सनावारांच्या तोंडावरच उपवासामुळे अनेक नागरिक भगर, साबुदाणा इत्यादी गोष्टी या मार्केटमधून किराणा दुकानावर आणत असतात. याच दरम्यान अनेक ठिकाणी सप्ताह अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपवासानिमित्त भगर किंवा साबुदाणा हे पदार्थ केले जातात आणि यातून असे प्रकार घडलेले वारंवार पाहायला मिळतात. मात्र, सणांच्या आणि उपवासाच्या वेळेला अन्न औषध विभागाने ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भगरी स्टॉक केल्या जातात त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. काल झालेल्या या विषबाधेमुळे अनेक नागरिक बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. उलटी मळमळ आणि चक्कर असे प्रकार या ठिकाणी झालेले पाहायला मिळाले आहेत, यामध्ये महिलांचा जास्त समावेश असल्याचा पुढे आलं आहे.

तर खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबादसह (Aurangabad) जालना (Jalna) जिल्ह्यात सुद्धा समोर आली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी १३ जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील २४ जणांना विषबाधा झाली आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर म्हणाले, लासूर स्टेशन येथील दुकानातून संबंधितांनी भगर खरेदी केल्याचे समजले. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येईल. तर अन्नबाधा झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा:

या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला? केंद्र सरकारने केली घोषणा

घ्या जाणून वेळापत्रक ; नागपूरवरुन सुटणार ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version