पुण्यातील आंदोलन यशस्वी, विद्यार्थ्यांना दिलासा, MPSC च्या परीक्षेची तारीख बदलली

पुण्यातील आंदोलन यशस्वी, विद्यार्थ्यांना दिलासा, MPSC च्या परीक्षेची तारीख बदलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. आज आयोजित केलेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन (MPSC) यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

येत्या रविवारी म्हणजेच २५ ऑगस्ट २०२४ रोजी आयबीपीएस (IBPS) आणि एमपीएससी (MPSC) या दोन्ही परिक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या २१ ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरल्या आणि त्यामुळे MPSC सह सरकारची पळापळ सुरू झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आता एमपीएससी (MPSC) कडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयबीपीएस आणि एपीएमसी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा बाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी प्रयत्नशील होते. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता आणि त्यातून आंदोलनही सुरू झाले होते. या संदर्भात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ तारखेची जी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. परीक्षा तारखा लवकरच निश्चित करून जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात अशा तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयबीपीएस (IBPS) आणि एमपीएससी (MPSC) कडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. यामुळेच दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर प्रश्न निर्माण झाला होता. दोन्ही महत्त्वपूर्ण परीक्षा एकाच दिवशी कशा द्यायच्या, असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात होता. यासाठी विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज २२ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. एमपीएससी  (MPSC) कडून परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला असून या परीक्षेची तारीख आता बदलण्यात आली आहे. परीक्षा नक्की कोणत्या दिवशी होणार, हे अद्याप जाहीरपणे सांगितले नसले तरीही आता एमपीएससीची  (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

Badlapur School Case: कारवाईला उशीर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे Devendra Fadnavis यांचे आदेश

बदलापूरवरील घटनेवर हरभजन सिंग संतापला, एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला..

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version