महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे, शनिवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे, शनिवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद (Maharashtra-Karnataka demarcation) प्रचंड तापला आहे. त्यात काल बेळगाव (Belgaum) मध्ये हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोला नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही गाड्यांवर दगड फेक करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. या घटनेचे पडसाद आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसून आले. ठाकरे गट, राष्ट्रवादी, मनसे आणि विविध संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आलं. याच वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. अशातच शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Watch video तिने हिंमत सोडली नाही, लढत राहिली आणि अखेर संकटातून बाहेर पडली, पहा व्हिडिओ

केवळ राजकारणाचा भाग म्हणून मराठी माणसाची कळ काढली जात असून अशा प्रसंगी सीमा बांधवांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये शाहू समाधी परिसरामध्ये आंदोलन उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घेतला आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर आज बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

हसन मुश्रीफ म्हणाले की, प्रकरण कोर्टात असताना अशी वक्तव्ये कर्नाटकच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नाहीत. आपली सत्ता येण्यासाठी महाराष्ट्राची कळ काढून कर्नाटकात सत्ता आणू पाहत आहेत. जाणीवपूर्वक भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आहेत. शरद पवार यांनाही बेळगावमध्ये बंदी घातली होती, पण पवार साहेब आदल्याच दिवशी बेळगावमध्ये पोहोचले होते. वेषांतर करून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे सीमाभागातील नेत्यांनाही या ठिकाणी येण्यास विनंती केली जाणार आहे.

अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजी घेण्याचा दिला सल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दूरध्वनी करून सीमा प्रश्नावर तसेच गेल्या आठवड्यातील घडामोडींची संपूर्ण माहिती दिली. काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या दूरध्वनी संवादाचा दाखला सुद्धा त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राचा विषय अमित शाह यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. कालच माध्यमांशी बोलताना हा विषय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

राज ठाकरेंनी दिला कर्नाटक सरकारला इशारा

Exit mobile version