spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MPSC च्या मायाजालाने घेतला अजून एकाचा जीव, नैराश्येतून पुण्यातील तरुणाने केली आत्महत्या

एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

‘एमपीएससी’ लाखो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवणारे एक मायाजाल. दरवर्षी कितीतरी विद्यार्थी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे या परीक्षेच्या मागे घालवतात. खेड्यापाड्यातील आणि तसेच घरची परिस्थिती बेताची असणारे विद्यार्थी देखील अगदी मनापासून आणि आपल्याला नोकरी मिळेल या आशेने या परीक्षेची तयारी करतात. मात्र, शासनाचा भोंगळ कारभाराला आणि आश्वासनांना कंटाळून आणि उमेद हारून एकतरी एमपीएससी आपलं आयुष्य संपवतो.

आता अशीच एक आत्महत्येची घटना पुण्यात घडली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, त्रिभुवन जानेवारी २०२१ पासून पुण्यात राहत होता. पुण्यात तो आपल्या मित्रांसोबत राहत होता. आज दुपारच्या सुमारास त्याच्या राहत्या खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १८ ते २० लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी फक्त चार ते पाच हजार पदांकरीताच पदभरती केली जाते. फक्त एवढेच नव्हे भ्रष्टाचार, सरकारचे कामकाजामध्ये होणारे दुर्लक्ष, राजकीय हेवेदावे आणि चढाओढी आणि त्यानंतर मराठा आरक्षण आणि मग कोरोना अशा एक न अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना नैराश्य येत आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाकडून तातडीनं पावलं टाकली जाणं गरजेचं आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदेंचा शिवसेनेला टोला म्हणले, सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?

वयाच्या 48 व्या वर्षी मलायकाचा ग्ल्यामर्स हटके लुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss