MPSC विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबवणार

MPSC विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग, ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबवणार

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आज (१२ सप्टेंबर) सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबविली जाणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. तसेच सरकारने एमपीएससीला ५०१ जागांचे मागणीपत्र पाठवले आहे. त्यामुळे या पदांचा समावेश केला, तर राज्य सेवा परीक्षा एक हजार पदांसाठी होऊ शकते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. राज्य सेवा २०२२ ही परीक्षा १६१ पदांसाठी जाहीर झाली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून राज्य सेवा परीक्षेत पदांची संख्या वाढविण्याची मागणी देखील केली होती. या मागणीची दखल घेत ३४० पदांचा समावेश केला होता. त्यानुसार आता २१ संवर्गातील एकूण ५०१ पदांसाठी परीक्षा होत आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ मागणीपत्र पाठवावे आणि एकूण एक हजार पदांची परीक्षा घ्यावी, असे सुमेध पाटील आणि राम आडे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

शिंदे व फडणवीसांच्या रात्रीच्या भेटी सुरुच, प्रभादेवीमधील वादावर चर्चा ?

विद्यार्थ्यांची मागणी

मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीकडून १०० टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे. तरी सरकारी विभाग रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससी पाठविण्याबाबत प्रयत्नशील नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील राज्यसेवा २०२२ ही शेवटची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा ठरणार आहेत. तर, ३२ संवर्गातील रिक्त पदांचे मागणीपत्र तत्काळ एमपीएससीला पाठवावीत. या वर्षी ११ हजार २६ पदे एमपीएससीकडून भरली जातील, असे मंत्र्यांनी जाहीर केले असून अधिकाऱ्यांनी त्याचे पालन करावे. व नायब तहसीलदार, मुख्याधिकारी गट ब, उद्योग अधिकारी, कामगार विभागातील पदे, कौशल्य विकास अधिकारी, मंत्रालय कक्ष अधिकारी आदी रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे.

अनेक दिवसांच्या खंडानंतर आज राज्यात मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता

Exit mobile version