spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत; समोर आला भलताच प्रकार

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु केली. या योजनेचे फॉर्म भरणा प्रक्रिया सुरू होऊन आता ती मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये पात्र महिलांना महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचे पैसे मिळवण्यासाठी अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. अश्याचप्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात या योजनेअंतर्गत १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. योजनेचा अर्ज भरणाऱ्या भावांची चौकशी सुरू असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

घडलेला नेमका प्रकार काय ?
कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म बहिणीऐवजी १२ भावांनी भरल्याचे समोर आले आहे. फॉर्म भरण्याकरिता त्यांनी महिलेचे छायाचित्र वापरले. परंतु अर्जात आधारकार्ड (Aadhar card) स्वतःचेच वापरले आहे. तसेच हमीपत्र सुध्दा स्वतःच्या नावाने अपलोड केला आहे. मात्र फोटो महिलेचा लावला आहे. समोर आलेल्या घटनेची सखोल तपासणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या १२ जणांव्यतिरिक्त इतर आणखीही पुरुषांनी या योजनेचे फॉर्म भरल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्व अर्जांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणी सुरू आल्याचे शंभूराजे देसाई म्हणाले
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले जात नव्हते. परंतु त्यावर शंभूराजे देसाई म्हणाले की, “ही नवीन योजना असल्याकारणामुळे अनावधाने नाव घेतले जात नव्हते.” आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच उल्लेख केला जातोय. परंतु या योजनेतून एकही महिला वंचित राहू नये असाच प्रयत्न आहे. काही जणांनी कन्नडसारखा प्रकार केलेला आहे, त्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा!, सर्वोच्च न्यायालयाकडून ६ महिन्यांनी जामीन

लाडक्या बाप्पासाठी स्वरूप भालवणकर, सुदेश भोसले आणि आरजे अर्चना पानिया यांचा “बाप्पाचा बोलबाला” गाणं रिलीज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss