spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: बदलाचे साक्षीदार नव्हे, शिल्पकार व्हा! लाडक्या बहिणींना मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दि.३१.०८.२०२४ नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि, या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. शासनाचा हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९०२१८१०५००३३० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात आला असल्याची माहिती शासनाच्या परिपत्रिकातून देण्यात आली आहे.

महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. बदलाचे साक्षीदार नव्हे.. शिल्पकार व्हा… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हा!, असे आवाहन अदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत’ (Narishakti Doot) या अ‍ॅपद्वारे फॉर्म भरण्यात येत होते. त्यानंतर आता १ ऑगस्ट २०२४ पासून नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया जास्त सोपी होणार आहे. महिलांना आपले अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटमार्फत दाखल करता येणार आहेत.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे,

  • जन्म दाखला (Birth Certificate)
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (School Leaving Certificate)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
  • योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: ST कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक; ऐन गणेशोत्सवात भक्तांची होणार कोंडी?

Ganeshotsav 2024: गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवा ‘हा’ गोड पदार्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss