MUKHYAMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJANA: फॉर्म तर भरला पण पैसे कधी मिळणार?

MUKHYAMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJANA: फॉर्म तर भरला पण पैसे कधी मिळणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत होणार आहे. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेमध्ये नेमके कोणते निकष असणार आहेत, याबाबत सर्वांचाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनामध्ये पात्रतेचे वय, अटी आणि कागदपत्रे जमा करण्याचा कालावधी वाढवला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होताना सध्या पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत अजूनही संभ्रम व्यक्त केला जात होता. त्याबाबत आता उत्तर देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरून 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर एक ऑगस्टला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अंदाजे 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

हा अर्ज भरताना आधार कार्ड (Aadhar Card), रेशन कार्ड (Ration Card), उत्पन्नाचा दाखला (Income Certificate), रहिवासी दाखला (Domicile Cetificate), बँक पासबुक (Bank Passbook), अर्जदाराचा फोटो (Passport size Photo) अधिवास किंवा जन्माचे प्रमाणपत्र (Birth Certificate) आणि लग्नाचे प्रमाणपत्र (Marriage Certificate) हे कागदपत्रा आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळणार आहे. यासोबतच, या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच नारीशक्ती दूत (Narishakti Doot) हा ॲपचा सोपा पर्याय सुद्धा महिलांकरता उपलब्ध आहे.

हे ही वाचा:

Health is Wealth : आयुर्वेदातील ‘हे’ पदार्थ दुधात मिसळल्यास; आजारांनवर होतो परिणाम !

राजकीय पक्षांनी Reservation बाबत आपली भूमिका लेखी कळवावी, CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version