spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता मिळणार कधी? Aditi Tatkare यांनी दिलं उत्तर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबरमध्ये रायगडमध्ये होणार आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून यावेळी सप्टेंबरपर्यंत आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत. स्क्रूटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही, त्यांचे सर्व लाभ दिले जातील. २ कोटी महिलांना लाभ दिले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली.

महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. बदलाचे साक्षीदार नव्हे.. शिल्पकार व्हा… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हा!, असे आवाहन अदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत’ (Narishakti Doot) या अ‍ॅपद्वारे फॉर्म भरण्यात येत होते. त्यानंतर आता १ ऑगस्ट २०२४ पासून नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया जास्त सोपी होणार आहे. महिलांना आपले अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटमार्फत दाखल करता येणार आहेत.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे,

  • जन्म दाखला (Birth Certificate)
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (School Leaving Certificate)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
  • योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये,असे सांगून  मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले होते.

हे ही वाचा:

‘नवरा माझा नवसाचा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; तीन दिवसांत इतक्या रुपयांचे कलेक्शन

मार्क्सवादी नेते अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; आज शपथविधी पडणार पार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss