वंदे भारतमुळे मुंबई लोकल सेवेला बसणार फटका

महाराष्ट्राला लवकरच नवीन वर्षात सहावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे.

वंदे भारतमुळे मुंबई लोकल सेवेला बसणार फटका

महाराष्ट्राला लवकरच नवीन वर्षात सहावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही वंदे भारत मुंबई – जालना अशी सुरु करण्यात येणार आहे. पण प्रवाशांसाठी ही चांगली बातमी असली तरी मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे. वेगवान सेवा आकर्षक लूकमुळे वंदे भारत ही चांगलीच आहे. देशभरात वेगवेगळ्या मेल एक्सप्रेस धावत आहेत. तर महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस सेवा पाच ठिकाणी सुरु आहे. आता लवकरच मुंबई ते जालना ही सहावी रेल्वे महाराष्ट्राला मिळणार आहे. ही चांगली बातमी असली तरी मुंबईकरांच्या डोकेदुखीमध्ये वाढ होणार आहे.

नवीन वंदे भारत सुरु होणार असल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. यामुळे मुंबईतील अनेक रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे. मात्र या सगळ्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. प्रवाशांचा प्रवास आणखीन विलंबाने होण्याची शक्यता आहे. वंदे भारत ही कमी वेळात खूप प्रशिध्द झाली आहे. प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा, वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा वंदे भारत ट्रेनला प्राधान्य दिले जात आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई ते गांधीनगर सुरु करण्यात आली. आठवड्यातील सहा दिवस धावणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसला चांगली मागणी आहे. नंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर सुरु करण्यात आली. महाराष्ट्राला सहावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.

मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी- सोलापूर व सीएसएमटी – मडगाव या तीन वंदे भारत धावत आहेत. ३० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या सहाव्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. येत्या नवीन वर्षात मुंबई जालना वंदे भारत ट्रेन चालू होणार आहे. त्यामुळे अनेक गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. मुंबईकरांचा मनस्ताप वाढणार आहे.१३ रेल्वेगाड्या आणि ७ लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

Exit mobile version