spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१ नोव्हेंबरपासून सुरू होणार मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी

वॉटर टॅक्सी (Water Taxi) सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे. जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटा दरम्यान ही सेवा सुरू आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

लवकरच बेलापूर ते गेट वें ऑफ इंडियापर्यंत या नवीन वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या सुरू होतील. यात २ क्लास आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास जिथे चारशे रुपये तिकीट असेल, तर दुसरा आहे बिजनेस क्लास जिथे ४५० रुपये तिकीट आकारले जाईल. एक्झिक्युटीव्ह क्लास मध्ये १६० जणांची आसन क्षमता आहे तर बिजनेस क्लास मध्ये ६० जणांची आसन क्षमता आहे. डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवापर्यंत पोहोचण्यासाठी या वॉटर टॅक्सीला चाळीस मिनिटं लागतील. तर बेलापूर पासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाण्यासाठी केवळ एक तास या वॉटर टॅक्सीला लागेल. सध्या उपलब्ध असलेल्या इतर सर्व जलवाहतुकीच्या साधनांपैकी ही वॉटर टॅक्सी सर्वात जलद आणि सर्वात सुरक्षित मानली जात आहे.

मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून जवळपास २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. तसंच या टॅक्सीमध्ये एसीचीही सुविधा आहे. लवकरच गेटवे ऑफ इंडियावरूनही वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. सध्या मांडवा दरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. येत्या १० ते १५ दिवसांत गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटासाठी गेटवे ऑफ इंडिया इथून वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल.

हे ही वाचा :

प्लांटमध्ये तयार होणारे सी-२९५ विमान हे उच्च क्षमतेचे आणि जागतिक दर्जाचे अत्याधुनिक विमान असेल; राजनाथ सिंग

ट्विटर होतोय #BoycottCadbury ट्रेंड ; काय आहे यामागील कारण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss