spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई मेट्रोचा खर्च वाढला; वाढीव खर्चासाठी केंद्रसरकारकडे करणार पाठपुरावा

मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाचा खर्च आता १० हजार २६९ कोटी रुपयांनी वाढला आहे

कुलाबा – वांद्रे – सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाचा खर्च आता १० हजार २६९ कोटी रुपयांनी वाढला आहे. आधी २३ हजार १३६ रुपये खर्चाच्या असलेल्या या प्रकल्पाच्या ३३ हजार ४०५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास राज्य मित्रमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. मेट्रोच्या या वाढत्या सुधारित खर्चामुळे राज्यसरकारवरील भार आहे. त्यामुळे आता यातला काही खर्च केंद्रसरकारने उचलावा याकरिता राज्यसरकार आता पाठपुरावा करणार आहे.

सध्याचा सुधारित आराखडा पाहता महाराष्ट्र राज्य सरकारच्या वाट्याची २ हजार ४०२ कोटींवरून आता ३ हजार ६९९ कोटींवर आली आहे. त्यामुळे राज्याच्या समभागपोटी एकूण १ हजार २९७ कोटी इतकी वाढ झाली आहे. हि रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंबंधी आता निर्देश दिले आहेत. मेट्रो ३ च्या मार्गाची एकूण लांबी ३३. किमी आहे. तर हा संपूर्ण मार्ग भुयारी मार्ग आहे. या मार्गात एकूण २६ भुयारी तर १ जमिनीवर अशी एकूण २७ स्थानक आहेत. यामध्ये नरिमन पॉईंट, वरळी , वांद्रे – कुर्ला संकुल, आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ इत्यादी स्थानकांचा समावेश आहे.

सुधारित वित्तीय आराखड्यनुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेने दिलेले कर्ज आता १३ हजार २३५ कोटींवरून आता १९ हजार ९२४ कोटी इतके झाले आहे. याचा अर्थ असा कि एकूण ६६८९ कोटींनी वाढले आहे. हे वाढीव कर्ज घेण्यासाठी आज बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेच्या हडसन नदीच्या तटावर फडकणार तिरंगा

Latest Posts

Don't Miss